Pimpri : वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत पोलीस व नागरिक मित्र संघटनेची दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज- दिवाळी पाडवा निमित्त पोलीस व नागरिक मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध ठिकाणच्या वृध्दाश्रमातील आजी आजोबांसोबत अनोळखी दिवाळी साजरी करण्यात आली.

यंदा दिवाळी पाडवा निमित्ताने आकुर्डी येथील बाबा मुनी वृध्दाश्रम गुरूदवार आकुर्डी. स्नेहसावली श्री शंकर महाराज मठ आश्रम, रावेत. मातृसेवा सेवाभावी संस्था वृध्दाश्रम बिजलीनगर या ठिकाणच्या वृद्धाश्रमात जाऊन तेथील आजी आजोबा यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी मातृसेवा सेवाभावी संस्था वृद्धाश्रमाला वॉटर फिल्टर भेट देण्यात आला.

त्याचप्रमाणे हुतात्मा चापेकर बंधू गुरुकुल चिंचवड येथील अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांच्या सोबत खेळाचा आनंद घेतला.  चिंचवड येथे रस्त्यावर फुगे व खेळणी विकून पोट भरणाऱ्या कुटुंबातील भुकेल्या मुलांना देखील दिवाळी फराळाचे वाटप तसेच त्यांच्या लहान बाळांना दूध देण्यात आले. पोलीस व नागरिक मित्र संस्था शहरात गेले 19 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, वाहतूक नियोजन व ऋग्णमित्र या माध्यमातुन काम करते.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस व नागरिक मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिल पालकर, विठ्ठल सहाणे, सूर्यकांत बरसावडे, प्रकाश मिर्झापुरे, चंद्रकांत पवार,  हणमंत जाधव, अरुण पाटील, मंगेश कवी, दत्तात्रय खांबे, जयेश खांबे, शीला कार्लेकर, अरुण देवरे, प्रकाश जाधव यांनी परिश्रम घेतले. तसेच सुर्यकांत मुथियान यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.