Pimpri : पिंपरी पोलिसांकडून 41 लाखांचा गुटखा जप्त 

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोला जप्त करत तब्बल 40 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. 

वाहनचालक अश्‍फाक मोहम्मद हुसैन शेख, जाफर फैयाज शेख (दोघे रा. कुर्ला, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांना बातमीदारामार्फत मंगळवारी (दि. 23) सकाळी पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर एक आयशर टेम्पो (एमएच 04 / एचडी 9745) अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचून टेम्पोचा पाठलाग करुन जयश्री टॉकीज समोर टेम्पोला पकडले. टेम्पोतील दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी 50 पोत्यात भरलेला 40 लाख 90 हजार रुपयांचा एक हजार गोवा गुटखा जप्त केला.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे, रविंद्र जेकटे, पोलीस हवालदार विवेकानंद सपकाळे, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, पोलीस शिपाई संतोष भालेराव, उमेश वानखेडे, औटी, झंझाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.