Pimpri : पिंपरी पोलिसांनी केली 15 हजारांची ताडी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी अवैधरित्या ताडी बाळगणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीची 100 लिटर ताडी जप्त केली आहे.

आकाश राठोड (वय 30, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक शांताराम पांडुरंग हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शनिवारी (दि. 18) रात्री पावणेआठच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली की, भाटनगर पिंपरी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये एक व्यक्ती अवैधरित्या ताडीची विक्री करीत आहे. पोलिसांनी परिसरात सापळा रचून 15 हजार रुपयांची 100 लिटर ताडीचे दोन ड्रम जप्त केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.