Pimpri : आरोपीस अटक करण्यासाठी पोलिसांची आठ वर्षांपासून टाळाटाळ!

मुकेश केसवानी यांचा आरोप; आरोपीला लवकर पकडण्याचे पोलिसांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – स्वस्तात जमीन विक्री करावी, यासाठी दबाव आणून धमकी दिल्याप्रकरणी रमेश ओसवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आठ वर्षापासून पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही, असा आरोप मुकेश केसवानी यांनी केला आहे.

मुकेश केसवानी यांच्या वडिलांनी 1992 मध्ये वाकड येथे कलाटे यांच्याकडून जमिन खरेदी केली होती. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, 1996 मध्ये रमेश कुंदनमल ओसवाल (रा. जैन मंदीराजवळ, ढोरे नगर, जुनी सांगवी) यांनी जागेचे बनावट साठेखत तयार केले. तसेच सदरची जागा अल्पदरात विकावी, यासाठी केसवानी यांच्यावर 2011 साली काही जणांनी दबाव आणला, असल्याचे केसवानी यांनी सांगितले.

याप्रकरणी केसवानी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याबाबत चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश दिले. या प्रकारात सहभागी असलेल्या चार जणांना न्यायालयाने अटक करण्यास सांगितले. त्यावेळी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. मात्र, रमेश ओसवाल यांना अद्यापर्यंत अटक झालेली नाही.

सन 2018 केसवांनी यांनी बनावट कागदपत्रांबाबत न्यालयात धाव घेतली. त्यावेळी देखील न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत कागदपत्रे बनावट असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयास दिला. मात्र 2011च्या गुन्ह्यात पहिजे असलेला आरोपी रमेश ओसवाल याला अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. त्याला अटक करावी, अशी मागणी केसवानी यांनी पोलीस आयुक्‍त आणि पिंपरी पोलिसांकडे केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम म्हणाले, “रमेश ओसवाल याच्या विरोधात 2011 मध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यास अटक झालेली नसल्याने केसवानी यांनी न्यायालयात अपील केले. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही ओसवाल याला अटक करावी, अशी मागणी केली. त्यानुसार पोलीस त्याच्या मागावर आहेत. लवकरच त्याला अटक करू.”

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like