Pimpri : शहरातील 2 लाख 4 हजार 154 बालकांचे पोलिओ लसीकरण

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ( Pimpri ) पिंपरी- चिंचवड शहरातील 2 लाख 4 हजार 154 बालकांचे लसीकरण करण्यात आले.

मोहिमेचा उद्घाटन समारंभ आरोग्य वैद्यकीय अधिकारी  डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या शुभहस्ते  थेरगाव येथील रुग्णालयामध्ये संपन्न झाला. यावेळी शासनाचे सहाय्यक संचालक व पल्स पोलिओ नोडल ऑफिसर डॉ. अनिरुद्ध देशपांडे, पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार,  सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली ढोणे  डॉ. किशोरी नलावडे,  जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजीराव ढगे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. संध्या भोईर, वैद्यकीय अधिकारी, डॉ. अभिजीत सांगडे, टाटा मोटर्सचे सुनील तिवारी,  प्रणवकुमार एच.आर. हेड (CVBU) हे अधिकारी तसेच  नवीन थेरगाव रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

Pune : समाविष्ट गावांमधील थकबाकी वसुली थांबवा – अजित पवार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 1109 लसीकरण केंद्रांची स्थापना केली होती. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने।रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा 964 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन,मेट्रो स्टेशन अशा ठिकाणी 58 ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 81 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली.

मनपा परिसरात 1109 लसीकरण केंद्रांमार्फत 8 विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 75 वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली 255 पर्यंवेक्षक व 3203 लसीकरण लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत.  सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी, मॅनेजमेंट व ईतर शाखेमधील महाविद्यालयीन  विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम,बालवाडी शिक्षिका, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, रोटरी क्लबचे स्वयंसेवक, टाटा मोटर्स मधील स्वयंसेवक व इतर विविध सेवाभावी संस्थांच्या ( Pimpri ) स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

मनपा कार्यक्षेत्रातील 5 वर्षाखालील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण झाले आहे याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी वापरण्यात येणारी लस जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणीत केलेली आहे. तसेच लसीकरण करणारे कर्मचारी प्रशिक्षीत आहेत. आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांचे रविवारी पल्स पोलिओ लसीकरण झाले नसेल त्यांनी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.