Pimpri : सकारात्मक ! पिंपरीतील 80 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

Positive! The 80-year-old grandfather from Pimpri overcame Corona:

एमपीसी न्यूज – मोरवाडी, पिंपरी येथील रहिवाशी असलेल्या 80 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

या आजोबांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे त्यांना 6 जुलै रोजी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरातील ऑक्सीजन पातळी कमी असल्याने त्यांना ऑक्सीजन लावण्यात आले. तपासणीत त्यांना निमोनिया असल्याचे आढळून आले. तसेच, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली.

आजोबांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा त्रास आहे. या परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करणे फारच जोखमीचे होते. त्यांच्यावर त्वरित अतिदक्षता विभागात जीवन रक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर)वर उपचार सुरु करण्यात आले. सात दिवसात त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असल्याचे दिसून आले.

या उपचारांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती श्वसन विकार विभागाचे प्रमुख व कोविड रुग्णालयाचे मुख्य समन्वयक निवृत्त ब्रिगेडियर डॉ. एम. एस. बरथवाल यांनी दिली.

बरथवाल पुढे म्हणाले, या संपूर्ण प्रक्रियेत आयसीयुचे तज्ञ् डॉक्टर्स, निवासी डॉक्टर्स, भूल तज्ञ्, यांचे मोलाचे योगदान होते. या तज्ज्ञांच्या साहाय्याने गरजेनुसार आवश्यक औषधे व तपासण्या वेळेत केल्यामुळे वृद्ध आजोबांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश मिळाले.

सात दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर ते आज व्हेंटिलेटरवरून बाहेर येऊ शकले. आता त्यांना वॉर्डमध्ये दाखल केले असून त्यांना दोन दिवसांनी घरी सॊडण्यात येणार आहे .

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी या 80 वर्षीय आजोबांवर केलेल्या यशस्वी उपचाराबद्दल यात सहभागी सर्व डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.