Pimpri : .रिमझिम पावसातही स्वयंसेवकांनी पोलीस विभागास सहकार्य करत 3 टन निर्माल्य केले गोळा

एमपीसी न्यूज: प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे 150 स्वयंसेवक शाहूनगर, चिखली, पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी, प्राधिकरण, रावेत परिसरामध्ये गणेशोत्सव बंदोबस्तकरिता शहर पोलीस विभागास सहकार्य करीत होते.तसेच गणेश तलाव व चिंचवड घाट परिसरात निर्माल्यही गोळा केले.

शहरातील विविध प्रभागात व घाटांवरती समिती प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख म्हणून विजय मुनोत,गोपाळ बिरारी,बाबासाहेब घाळी,जयप्रकाश शिंदे,सतीश देशमुख,लक्ष्मण इंगवले,राजू येळवंडे,उद्धव कुंभार,भरत उपाध्ये,बळीराम शेवते,विजय जगताप, संदीप सकपाळ,राम सुर्वे,मंगेश घाग,संतोष चव्हाण, अमोल कानु, अँड विद्या शिंदे, अर्चना घाळी, देवयानी पाटील, तेजस सापरिया, जयेंद्र मकवाना, मनोहर दिवाण, सुनील चौगुले, देवजी सापरिया यांनी काम पाहिले.

कोसळणाऱ्या रिमझिम पावसातही समितीच्या विशेष पोलीस अधिकारी – पोलीस मित्र पदाधिकारी यांनी विसर्जन सोहळ्यास प्रमुख घाटावर (गणेश तलाव, सुभाष घाट, थेरगाव घाट,रावेत घाट, मोरया गोसावी मंदिर घाट,चिखली खाण )नागरिकांना गणेश विसर्जनास सहकार्य केले

रात्री साडेअकरा वाजता गणेश तलाव येथे गजराज मित्र मंडळ विठ्ठलवाडी या सार्वजनिक मित्र मंडळाचा शेवटचा गणपती विसर्जित झाला. रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी रावेत घाटावर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले. रात्री साडेबारा वाजेपर्यंत चिंचवड थेरगाव घाटावर सर्व गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले.

गणेश उत्सवामध्ये पोलीस विभागास उत्तम सहकार्य केल्यानिमित्त चिंचवड येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे, निगडी विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, चिखली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र आहेर, विशेष पोलीस शाखेचे राजाराम शेळके यांनी स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले

वाहतूक विभागाचे चिंचवड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे म्हणाले, “विसर्जन मिरावणुकीमध्ये ५ व्या ,७ व्या, ९ व्या व शेवटच्या दिवशी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वाहतुक पोलीस मित्रांनी प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमन योग्य पद्धतीने केले. त्यामुळे नागरिकांना विसर्जन मिरवणुकीचा आनंदही घेता आला व रस्ताही अडथळा मुक्त झाला. गणेशोत्सवामध्ये चिंचवड विभागात स्वयंसेवक, पोलीस मित्रांनी मोलाचे सहकार्य केले”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.