Pimpri : प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज –  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप हा त्यांची विशेष (Pimpri)ओळख आहे. शौर्य आणि पराक्रमाचे धाडस, निष्ठा, शिवसाम्राज्याचे प्रतीक  म्हणून हा टोप  ओळखला जाते.

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते प्रफुल्ल पटेल यांनी (Pimpri)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी मिळवून त्यांना खुश करण्यासाठी   मोदी यांच्या डोक्यावर  जिरेटोप घातल्याने शिवछत्रपतीचा, शिवभक्तांचा अवमान झाला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा, शौर्याचा पटेल यांनी अवमान केला असून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की रयतेचे  राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपाला एक  विशेष महत्त्व आहे.  शिवछत्रपती यांनी केलेला पराक्रम, युद्धसाहस व सैन्यातील मावळ्यांचे प्रेरणास्थान हा जिरेटोप आहे.

Talegaon Dabhade : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तामाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्र राज्याच्या  गौरवाचे  ते प्रतीक  आहे. महाराष्ट्राने सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा घटक आणि अस्मिता म्हणून त्यास जपले आहे.  मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती हा जिरे टोप घालून सबंध महाराष्ट्रातील जनतेचा आणि महाराष्ट्र राज्यातील अस्मितेचा अवमान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे.

त्यांचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करीत आहोत. पंतप्रधानांकडून काहीतरी मिळवायचे  म्हणून स्वागत कशा पद्धतीने करावे हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र लाचारी करुन निष्ठेचे प्रतीक असलेला जिरेटोप हा आमच्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. याचा आवमान आम्ही सहन करणार नाही.  पटेल यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अस्मितेशी खेळू नये. त्यांनी त्वरित माफी मागावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.