BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : लोकजनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र सचिवपदी वर्षा चौधरी

154
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लोकजन शक्ती पार्टीच्या महिला आघाडी महाराष्ट्र सचिव पदावर वर्षा कैलास चौधरी यांची निवड करण्यात आली. वर्षा चौधरी पिंपरी-चिंचवड परिसरात करत असलेल्या सामाजिक कामांची दखल घेत महिला सचिव पदावर निवड करण्यात आली आहे.

लोकजन शक्ती पार्टीच्या महाराष्ट्र चीफ सेक्रेटरी दीपाली श्रीकांत लोंढे यांच्या हस्ते चौधरी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक पुणे जिल्हा अध्यक्ष नसीम शेख, महाराष्ट्र राज्य सचिव दुराजी शिंदे, उपाध्यक्ष (अल्पसंख्यांक) विनोद सुंदर भालेराव, सकिकूल निशा, संध्या केदारी, माया ब्राह्मणे, पूनम साळवे, उषा साळवे, कृष्णावेजी कुडीपुडी, अरुण भैराळ, राहुल प्रधान, अनिल मखरे, राजकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.