Pimpri: संदीप खोत, मनोज लोणकर यांना सहाय्यक आयुक्‍तपदी बढती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासन अधिकारी संदीप खोत आणि मनोज लोणकर यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. महापालिकेच्या 4 ऑक्‍टोबरला झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत या बढत्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त संवर्गातील एकूण 11 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 11 पदे राज्य शासनाकडून प्रतिनिक्तीवर भरली जातात. तर उर्वरित पाच पदांवर महापालिका आस्थापनेवरील पात्र अधिका-यांना संधी दिली जाते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार मागासवर्गीयांना बढत्यांमध्ये पदोन्नती देण्यास मनाई करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या निर्णयांना अधीन राहून, तात्पुरत्या स्वरूपात खोत आणि लोणकर या दोन्ही अधिका-यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी महापालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.