Pimpri: एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूलच्या ‘लॉकडाऊन फोटोग्राफी’ स्पर्धेत प्रथमेश नौगण प्रथम

ओजस वडके, ऋतुराज झगडे द्वितीय तर डॉ. प्रिया गोरखे व सचिन राजोपाध्ये तृतीय

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित ‘लॉकडाऊन फोटोग्राफी’ स्पर्धेमध्ये निगडी यमुनानगर येथील प्रथमेश नौगण यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक रावेत येथील ओजस वडके व ऋतुराज झगडे यांनी मिळवला आहे. चिंचवडच्या डॉ. प्रिया गोरखे व सातारा येथील सचिन राजोपाध्ये यांनी तृतीय क्रमांक पटकवला आहे. या व्यतिरिक्त 15 छायाचित्रांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित ‘लॉकडाऊन फोटोग्राफी’ स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला. देशाच्या  कानाकोपऱ्यातून 750 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. हा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही बक्षिसांमध्ये सहर्ष भरघोस  वाढ केली आहे. स्पर्धेचे परीक्षण देवदत्त फोटोग्राफी स्कूलचे संचालक व ख्यातनाम छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी केले. व्दितीय व तृतीय क्रमांकाची प्रत्येकी दोन बक्षिसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच पारितोषिकाची रक्कम राहणार असून ती रक्कम विभागली जाणार नाही. तसेच उत्तेजनार्थ आता 5 ऐवजी 15 बक्षिसे देण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या उत्तमोत्तम, दर्जेदार फोटो प्रवेशिकांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांनी सांगितले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे.

  • प्रथम क्रमांक – प्रथमेश नौगण [यमुनानगर, निगडी]
  • व्दितीय  क्रमांक – ओजस  वडके [रावेत] व ऋतुराज झगडे [घरकुल, चिखली]
  • तृतीय  क्रमांक – डॉ. प्रिया गोरखे [चिंचवड] व सचिन राजोपाध्ये [सातारा]

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांची नावे

  • दत्ता गरुड  [खराडी पुणे] 
  • हर्षवर्धन  देशमुख [वाकड]
  • जॉर्ज  अरसुड [कासारवाडी]
  • मंगेश प्रसादे  [आळंदी]
  • मोहित शिंदे [सिंहगड रोड, पुणे]
  • पायल भयानी [घाटकोपर, मुंबई]
  • प्रशांत कांबळे [डांगे चौक]
  • रौनक तेजवानी [आकुर्डी]
  • समाधान गावडे  [धानोरे, खेड]
  • स्नेहा वराडे [पार्क स्ट्रीट, वाकड]
  • वृषाली आपटे संभाजीनगर, चिंचवड]
  • अरुण पवार [निगडी]
  • कोमल राऊत [माहीम, पालघर]
  • अभिजित घाडगे [पिंपळे गुरव]
  • चिन्मय कवी [चिंचवड]
लॉकडाऊन संपले की, पूर्वकल्पना देऊन देवदत्त फोटोग्राफी स्कूल, लिंक रोड, चिंचवड येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल, त्याबाबत सर्व विजेत्यांना ई-मेल व फोनवर देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार आणि सर्व विजेत्यांचे एमपीसी न्यूज व देवदत्त  फोटोग्राफी स्कूलतर्फे हार्दिक अभिनंदन!
परीक्षकांचे  मनोगत   
स्पर्धेच्या परीक्षणाचे काम खूप अवघड झाले होते कारण प्रतिसाद खूप मोठा होता. त्यामुळेच कुणाचाही उत्तम फोटो डावलला जाऊ नये, या उद्देशाने  पारितोषिकांची संख्या तब्बल 12 पारितोषिकांनी वाढवण्यात आली. तसेच स्पर्धा परीक्षणात मोबाईल व डीएसएलआर असा भेदभाव न ठेवता फोटोग्राफरची थॉट प्रोसेस विचारात घेतली गेली, करोनाच्या भयंकर छायेत घराबाहेर जाऊ नका, करोना अगदी दरवाज्यात आहे, हे सांगणारा  फोटो निर्विवाद प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांकाच्या दोन्ही  फोटोमधील विषयमांडणी खूप अचूक होती. महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा  मोठी बहीण लाडू  बनवताना पाहून आपणही प्रयत्न करताना असलेले लाडवाकडे असलेले लहान बहिणीचे लक्ष या फोटोग्राफरने टिपलेल्या  बारकाव्याकडे पाहताना आम्ही त्याला तृतीय क्रमांक दिलाय. तसेच सातारा येथून आलेल्या प्रवेशिकेमध्ये एका संगीत शिक्षकाच्या घरातील लॉकडाऊन काळात जमलेली अनौपचारिक बैठक ही तृतीय क्रमांकाची अजून एक मानकरी ठरली. आयुष्यातील निखळ आनंद देणारे काही क्षण, त्यातील उत्तम प्रकाशयोजना, उत्तम ले आऊट, हे उत्तेजनार्थ सर्व फोटोंचे बलस्थान ठरले. एक परीक्षक म्हणून मला अजून खूप उत्तम छायाचित्रे पाठविणाऱ्या सर्वच छायाचित्रकारांचे कौतुक करायला आवडेल.
देवदत्त कशाळीकर
संचालक, देवदत्त फोटोग्राफी स्कूल, चिंचवड 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.