Pimpri: प्रवीण तुपे यांच्याकडे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार; आता तीन अतिरिक्त आयुक्त

Pimpri: Praveen Tupe holds the post of Additional Municipal Commissioner; Now three additional commissioners सह शहर अभियंता प्रथमच अतिरिक्त आयुक्त पदावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रविण तुपे यांच्याकडे देण्यात आला आहे. तुपे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्याचा  आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) काढला आहे. यामुळे स्थानिक अधिकाऱ्याला न्याय मिळाला असून  महापालिकेत आता तीन अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. 
राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते.  महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.
त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.  यापूर्वी संतोष पाटील आणि अजित पवार हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. तर, महापालिका सेवेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी असलेले पद रिक्त होते.

त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या आवश्यकतेच्या दृष्टीने सहशहर अभियंता प्रविण तुपे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त आयुक्त तीन या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांना विभागाचेही वाटप केले आहे. तुपे यांच्याकडे आयटीआय मोरवाडी, कासारवाडी, कार्यशाळा विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण विभाग, सुरक्षा, क्रीडा आणि माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी दिली आहे.
तुपे यांनी विद्युत विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  सह शहर अभियंता म्हणून त्यांना 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर, महापालिका सेवेत 36 वर्ष झाले आहेत. त्यांनी सायन्स पार्कचे स्वप्न सत्यात उतरवले. मागील सहा वर्षांपासून सायन्स पार्कचे कामकाज उत्तमरीत्या चालू आहे.  संस्थापक संचालक  तर ऑटो क्लस्टर मध्ये संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
त्यांनी शहरात सांस्कृतिक क्षेत्र वाढविले. 21 वर्षांपासून स्वरसागर महोत्सव घेतला जात आहे. विद्युत विभागात ऊर्जा निर्मितीवर भर दिला. नाशिक फाटा येथील पुलाला रंगीत विद्युत रोषणाई केली. टॉवर कमी खर्चात बसवून घेतले आहेत. अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे. सह शहर अभियंता ते अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत तुपे यांनी मजल मारली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.