Pimpri : 94 सेकंदात 197 देशांची नावे सांगणाऱ्या प्रीत शिरोडकरला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचा किताब

एमपीसी न्यूज – इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या प्रीत राजेश शिरोडकरला 197 देशांची नावे तोंडपाठ आहेत आणि ती सर्व  नावे न अडखळता अवघ्या 94 सेकंदात म्हणून दाखवण्याची किमया तो सहज करतो. प्रीतच्या या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने घेतली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रीतचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हा किताब पटकावल्याबद्दल प्रीत शिरोडकरचा महापौर दालनात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे “अग्निपंख” पुस्तक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. महापौर ढोरे यांनी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.