Pimpri: प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी यांना ‘आदर्श विद्या सरस्वती’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – ग्लेशियर जर्नल फौंडेशन ग्लोबलजमेंट कौन्सिल अहमदाबादतर्फे 2019 देशातील सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक राष्ट्रीय ‘आदर्श विद्या सरस्वती’ पुरस्कार प्राचार्य डॉ. अभिजीत शशिकांत कुलकर्णी यांना मिळाला.

डॉ. अभिजीत कुलकर्णी सध्या अशोकराव माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च सावे शाहुवाडी येथे प्राचार्य म्हणून काम करत आहेत. पुणे विद्यापीठातून, मास्टर इन फार्मसी घेतली डिग्री घेतली आहे. त्यांनी त्यावेळेस यकृत संरक्षणावर संशोधन केले होते. पुढील वाटचालीकरीत डॉ. एम.जी.आर. वैद्यकीय विद्यापीठ मधून डॉक्टरेट पदवी प्रप्त केली आहे.

  • डॉक्टरेटचे संशोधनमध्ये त्यांनी पाच वन औषधीचे मिश्रण करून यकृत आणि पोटाचे विकारांवर महत्वाचे असे संशोधन केले. त्यांचा औषधनिर्माणशास्त्र विषय असून त्यांनी सर्व संशोधन हे एक्सपेरिमेंटल ऍनिमलवर केले आहेत. डॉ. कुलकर्णी यांना 10 वर्षे पेक्षा जास्त शैक्षणिक आणि 8 वर्षे संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय स्थरावर आपले 16 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांनी दोन पुस्तके लिहलेली आहेत.

या सर्व उपक्रमाचा आढावा घेत ग्लोबल मॅनॅजमेण्ट कौन्सिलने त्यांना 2019 चा राष्ट्रीय आदर्श विद्या सरस्वती पुरस्कार जाहीर केला आहे. सोबत त्यांना देशाच्या सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक असे पात्र ठरवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.