Pimpri: राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडून महापालिकेच्या ‘कोरोना वॉर’ रुमची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपायोजना व कोविड-19 वॉररुमची पाहणी राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आज (सोमवारी) केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोविड-19 वॉररूम अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती त्यांना दिली.

महापालिका परिसरातील सध्यस्थीतील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी प्रधान सचिव पाठक यांना दिली. यशवंतराव चव्हाण रुग्णालय हे पूर्णपणे कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आले असून इतर रुग्णांना डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये उपचाराची सोय करण्यात आल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन वैद्यकीय पथकामार्फत त्यांची तपासणीची कार्यवाही करण्यात येते. यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय व भोसरी रुग्णालय येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे अशीही माहिती आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी प्रधान सचिव पाठक यांना दिली.

नागरिकांचा कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंचा अवलंब करणे. या बाबींबाबत दक्षता घ्यावी व तसे नागरिकांना प्रोत्साहन करावे अशी सूचना प्रधान सचिव महेश पाठक यांनी आयुक्तांना दिली.

महापालिकेच्या वतीने नागरीकांचे सोयीसाठी सारथी अॅप मुरू केले असून त्याद्वारेही माहिती घेण्यात येते असल्याचे तसेच नागरिकांनी स्मार्ट सारथी ऍप चे माध्यमातून विविध प्रकारची माहिती घरी बसल्या मिळत आहे. तसेच केंद्र सरकारने विकसीत केलेल्या आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करण्याबाबत नागरीकांना अवाहन करण्यात आल्याची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.

यावेळी अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहय्यक आयुक्त अण्णा बोदडे इत्यादी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.