BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून निगडी पोलीस ठाण्यास प्रिंटर भेट

55
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून निगडी पोलीस ठाण्याला आगामी तंत्रज्ञान असलेला प्रिंटर म्हणून देण्यात आला. प्रिंटर देण्याचा कार्यक्रम आज (शुक्रवारी) निगडी पोलीस ठाण्यात झाला.

या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी दलाल, मुक्ती पानसे, साधना काळभोर, स्मिता ईळवे, रो. अर्जुन दलाल, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरु झाले. पोलीस आयुक्तालयाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आयुक्तालयाच्या कारभारासह पोलीस ठाण्यांच्या कारभारासाठी देखील काही अडचणी येत आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी परिसरातील सामाजिक संस्थांचे सहकार्य असणे फार महत्वाचे असते. इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून थ्री इन वन असणारी प्रिंटर, स्कॅनर आणि कॉपी मशीन देण्यात आली. अशा प्रकारच्या मदतीमुळे पोलीस ठाण्याचे कामकाज आणखी चांगल्या प्रकारे सुरु राहण्यासाठी मदत होणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3