Pimpri : मानव संसाधन विकास संस्थेच्या काळेवाडी शहर अध्यक्षपदी प्रीतम शाह यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- मानव संसाधन विकास संस्थेच्या काळेवाडी शहर अध्यक्षपदी प्रीतम शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हाळसकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, मानवी हक्क आणि मानव संसाधन विकासाबाबत सामाजिक समस्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रीतम शहा यांची नेमणूक करण्यात आली आहे. संस्थेच्या नियम व अटींच्या अधीन राहून आपण आपले सामाजिक कार्यात योगदान द्यावे. ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.