-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : खासगी कंपन्यांच्या सी.एस.आर.फंडातून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याची मागणी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात आणि पवना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पवना धरणामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांकाठच्या हजारो नागरीकांचे नेसत्या वस्त्रानिशी स्थलांतर करावे लागले आहे. खासगी कंपन्याच्या सी.एस.आर. फंडातून पूरग्रस्तांसाठी मदत मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

या निवेदनांत म्हटले आहे की, घरातील दैंनदिन गरजेच्या चीजवस्तू, भिजल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जरी पूर ओसरला तरी पुरात या नागरीकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्याने लगेचच त्यांना सर्वसामन्य जीवन सुरु करता येणार नाही. सरकारी यंत्रणा त्यांना मदत करीत आहे. परंतु ती पुरेशी नाही. त्यामुळे हे सर्व नागरीक आपलेच बांधव आहेत, त्यांना आपण मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. म्हणून या नागरिकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

  • पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून प्रसिध्द या शहरात मोठ मोठ्या खासगी कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या सी.एस.आर. फंडामधून पूरबाधितांना महापालिकेच्या माध्यमातून मदत देता येईल. कारण मनपाकडे पूरग्रस्तांची यादी आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी महापालिकेच्या खात्यावर सी.एस.आर. फंडाची रक्कम वर्ग केल्यास त्यातून सर्व पूरग्रस्तांना मनपामार्फत मदत मिळू शकेल.
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn