Pimpri: विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न; विश्वजीत बारणे यांचे घरगुती कार्यक्रमातील फोटो केले व्हायरल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या नेटीझन्सच्या समर्थकांकडून पार्थ पवार यांच्यावरील टीकेल उत्तर देण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत यांचे घरगुती कार्यक्रमातील फोटो व्हायरल केले जात आहेत. विश्वजीत यांचा बहिणींसोबतचा फोटो व्हायरल केला जात आहे.

शेवटच्या टप्प्यात मावळातील प्रचाराची पातळी खालावली आहे. गुरुवारी (दि. 25) रात्रीपासून महायुतीच्या नेटीझन्सच्या समर्थकांनी पार्थ पवार यांचे वैयक्तीक बदनामी करणारे फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाआघाडीच्या नेटीझन्स सर्मथकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वैयक्तिक बदनामी करणारे फोटो ‘सोशलमिडीया’वर व्हायरल केले होते.

महाआघाडीच्या नेटीझन्स सर्मथकांकडून पार्थ पवार यांच्यावरील टीकेल उत्तर देण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांचे घरगुती कार्यक्रमातील फोटो व्हायरल केले जात आहेत. विश्वजीत यांचा व्हायरल केला जात असलेला फोटो लग्न समारंभातील आहे. फोटोमधील सर्व त्यांच्या भगिनी आहेत. घरगुती फोटो व्हायरल केला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.