Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या समस्या सोडविणार ; मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा, सिंहगड एक्सप्रेसला पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी, चिंचवड येथे एक्सलेटर किंवा लिफ्ट बसविणे, एक्सप्रेस गाड्यांसाठी इलेक्ट्रॉनिक कोच फलक लावण्यात यावे, कॉलेजच्या मुला-मुलींसाठी मासिक व त्रैमासिक पास पुस्तिका चिंचवड येथे उपलब्ध व्हावी आदींबाबत महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रेल्वेच्या दृष्टीकोनांतून पाहणी करुन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

चिंचवड रेल्वे स्थानकावर मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, सल्लागार अ‍ॅड. अरविंद सावंत, नारायण भोसले, शरद चव्हाण, डॉ. पोर्णिमा कदम, रमेश भामरे, सुधीर साहनी, तात्या उर्फ जयकुमार मंजूगडे, जॉनी फ्रान्सीस, अनंत रामन, रेल्वेचेु मुख्य वाणिज्य प्रबंधक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष के. हरीनारायण आदी उपस्थित होते.

यावेळी प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी दिलेल्या लेखी निवेदनातील मागण्यांबाबत चर्चा केली. चिंचवड येथे विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा, सिंहगड एक्सप्रेसला पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी उपलब्ध करून देण्यात यावी, चिंचवड येथे एक्सलेटर किंवा लिफ्ट बसविणे, एक्सप्रेस गाड्यांसाठी इलेक्ट्रॉनिक कोच फलक लावण्यात यावे, कॉलेजच्या मुला-मुलींसाठी मासिक व त्रैमासिक पास पुस्तिका चिंचवड येथे उपलब्ध व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आली.

या मागण्यांचा विचार करून रेल्वेच्या दृष्टीकोनांतून पाहणी करुन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन शर्मा यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.