HB_TOPHP_A_

Pimpri : संविधान भवनाच्या कामाला गती; प्राधिकरणाच्या पाच एकरावर साकारणार संविधान भवन

आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा  

907

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पाच एकरावर देशातील पहिले संविधान भवन साकारण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असून दहा कोटीची तरतूद केली जाणार आहे. औद्योगिकनगरीत देशातील पहिले संविधान भवन साकरण्यास चालना मिळाली आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरु आहे.

HB_POST_INPOST_R_A

आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतील नगरसेवकांसह प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेऊन संविधन भवनासाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्याचा आढावा घेण्यासाठी भोसरीतील नगरसेवकांनी पुन्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष खाडे यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक विकास डोळस, आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत गायकवाड, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, नगरसेविका योगिता नागरगोजे, राहुल माघाडे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके उपस्थित होते.

संविधान भवन उभारण्यासाठी प्राधिकरणाचा पाच एकराचा भूखंड देण्यात येणार आहे. भूखंड अंतिम करुन त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. तब्बल पाच एकर भूखंडावर संविधान भवन साकारणार आहे, असे प्राधिकरणाचे अध्यक्ष खाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके यांनी सांगितले.  त्यामुळे संविधान भवनाच्या कामाला चालना मिळणार आहे.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ” देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवड शहराता उभारण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. संविधान उभारण्यासाठी प्राधिकरण पाच एकरचा भूखंड देणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. त्यानंतर सल्लागार नेमण्यात येणार आहे. यामुळे संविधान भवनाच्या कामाला चालना मिळणार आहे. प्राधिकरणाने जागा दिल्याबाबत त्यांचे आम्ही आभार मानत आहेत”.

”संविधान भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संविधान भवनसारखी वास्तू जर संपूर्ण संविधान जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरात उभा राहत असेल. तर, हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय एकतेचा सन्मान आहे. संविधानातील नैतिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग आला आहे’, असेही डोळस म्हणाले.

संविधान भवनाची वैशिष्ट्ये!

संविधान अभ्यास केंद्र असणार आहे. त्यामध्ये तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळा घेतल्या जातील. याशिवाय इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध असतील. ‘ई’-लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु केल्या जाणार आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: