Pimpri: प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार; शेवटच्या दिवशीही उमेदवारांकडून ‘रॅली, पदयात्रा’चे नियोजन

एमपीसी न्यूज – गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा गदारोळ उद्या (शनिवारी) सायंकाळी थांबणार असून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उद्या (शनिवारी) शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून उमेदवारांकडून प्रचाराची सांगता करण्याचे नियोजन केले जात आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत असून 24 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकिय पक्षांच्या प्रचार सभा, रॅलीचा धुमधडाका सुरु असून आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय मैदान तापले आहे. उद्या (शनिवारी) शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उमेदवारांकडून प्रचार फेऱ्या आयोजित केल्या आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे.

त्यानंतरचा सोमवारी मतदानापर्यंतचा कालावधी निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांच्या यंत्रणेसाठी ‘जागते रहो’चा ठरणार आहे. छुप्या पद्धतीने प्रचार करण्यावर उमेदवारांकडून भर देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.