Pimpri : पुढील टप्प्यात निगडी ते वाकड व वाकड ते चाकण मेट्रो मार्गांचा प्रस्ताव – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज –  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी (Pimpri) व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) सकाळी महा मेट्रोने प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. पिंपरी ते भक्ती- शक्ती या टप्प्यानंतर निगडी- किवळे- रावेत- वाकड तसेच वाकड- नाशिक फाटा- भोसरी- चाकण या दोन नवीन मेट्रो मार्गाचा प्रस्ताव असल्याचे बारणे यांनी यावेळी प्रवाशांना सांगितले.

खासदार बारणे यांनी सकाळी पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोने प्रवास केला. त्यांच्या (Pimpri)समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे तसेच अनेक पदाधिकारी होते.

Bhosari : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून दमदाटी केल्याचा आरोप

खासदार बारणे यांनी पाठपुरावा करून पिंपरी ते भक्ती-शक्ती या मेट्रो मार्गाला परवानगी मिळविल्याबद्दल प्रवाशांनी त्यांना धन्यवाद दिले. पुढील टप्प्यामध्ये निगडी- किवळे- रावेत- वाकड या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव आहे. हा मार्ग शिवाजीनगर- हिंजवडी या मार्गाला जोडला जाईल. या खेरीज वाकड- नाशिक फाटा- भोसरी- चाकण हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे. त्यामुळे शहरातील मेट्रो सेवेचे जाळे बऱ्यापैकी विस्तारले जाणार आहे, अशी माहिती बारणे यांनी यावेळी दिली.

मेट्रोमुळे प्रवास सुखकारक, आनंददायक होत असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे प्रवाशांनी यावेळी आवर्जून सांगितले. मेट्रो स्थानाकांजवळ प्रशस्त वाहनतळची सोय व्हावी, अशी अपेक्षा काही प्रवाशांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.