Pimpri: ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’च्या विरोधातील धरणे आंदोलनाचा पाचवा दिवस

संविधान बचाव समितीचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने शुक्रवार (दि. 17) पासून धरणे आंदोलन सुरु आहे. धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे.

पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारपासून नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर या कायद्याच्या विरोधात हे धरणे आंदोलन सुरु आहे. यामध्ये मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

”हिंदु मुस्लीम भाई, एनआरसी, सीएए बाय, बाय”, ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’ रद्द करा”, ”भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र है”, ”हमको चाहिय आजादी” अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात येत आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर या कायद्यांमुळे विविध नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांना आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागणार आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.