Pimpri: ‘ईव्हीएम हटाओ, आरटीआय’ बचाओबाबत रविवारी परिषद

एमपीसी न्यूज – ईव्हीएम हटाओ, आरटीआय’ बचाओ जनआंदोलन समिती पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने उद्या (रविवारी) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत डॉ. विश्वंभर चौधरी केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेला बदल नेमका कशासाठी ? या विषयावर तर अॅड. असीम सरोदे ‘ईव्हीएम’ कायद्यावर हल्ला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याबाबतची माहिती जनआंदोलनाचे मुख्य समन्वयक मारुती भापकर यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात रविवारी सकाळी दहा वाजता ही परिषदे होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत मानव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद होणार आहे.

या परिषदेला विश्व कल्याण कामगार संघटनेचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे सचिन साठे, भारिपचे देवेंद्र तायडे, एमआयएमचे अकिल मुजावर, मनसेचे सचिन चिखले, शेकापचे नितीन बनसोडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता सायकर, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.व्ही.व्ही. कदम, डॉ. सुरेश बेरी, आपचे प्रकाश पठारे, प्रकाश जाधव, आनंदा कुदळे, प्रदीप पवार, गिरीष वाघमारे, क्षितीज मानव, अॅड.मोहन अडसुळ, काशिनाथ नखाते, सतीश काळे, धनाजी येळकर, अभिमन्यू पवार, प्रल्हाद कांबळे, प्रभाकर माने, उमेश सणस, क्रांतीकुमार कडूलकर, जगन्नाथ आल्हाट, सचिन देसाई, डॉ. भास्कर बच्छाव, हरिश तोडकर, सिददीक शेख, अशोक भडकुंबे, राजु वारभुवन, स्वप्नील कांबळे, सतीश गायकवाड शहरातील विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जनआंदोलनाचे मुख्य समन्वयक मारूती भापकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.