Pimpri: कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना पूर्ण बरे झाल्याचा, निगेटिव्ह असल्याचा दाखला द्या – जितेंद्र ननावरे
Prove that patients who have overcome corona are completely cured, negative - Jitendra Nanavare : कोरोनामुक्त झाल्याचा पुरावा नसल्याने कामगारांना कंपनीत नो एन्ट्री
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आजारावर मात केलेल्या रुग्णांना पूर्ण बरे झाल्याचा अथवा कोविड निगेटिव्ह असल्याचा दाखला देण्याची मागणी युवासेनेचे पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी पालिकेकडे केली आहे.
याबाबत ननावरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिक रुग्णालयात पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आल्यानंतर त्याचे उपचार झाल्यावर पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला घरी सोडताना त्याच्या डिस्चार्ज कार्डवर तो निगेटिव्ह आहे, असा शिका असावा किंवा तो पूर्णपणे बरा झाला आहे असा उल्लेख असावा.
कारण रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याचे त्याच्याकडे काहीही पुरावा नसतो. त्यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणारा कामगार वर्ग किंवा ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग यांना ते पूर्णपणे बरे झाले आहेत. याचा काही पुरावा नसल्याने त्यांना कामावर रुजू करून घेतले जात नाही.
कंपन्या व आस्थापनांनी कामगारांना निगेटिव्ह रिपोर्ट आणा नाहीतर कामावर येऊ नका, असा फतवा काढल्याने कामगार वर्गात मोठ्या प्रमाणावर निराशा निर्माण झाली आहे.
कोरोना रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला तो पूर्ण बरा झाला आहे हे सिद्ध करता येत नाही. त्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह कामगार बरे झाल्यानंतर त्यांना काहीही पुरावा नसल्याने मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
त्यासाठी कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्याला तो पूर्ण बरा झाला आहे हे सिद्ध करता आले पाहिजे असा काहीतरी पुरावा त्यांना मिळावा.
अथवा आपल्या अधिकारामध्ये आपण याबाबत कंपन्यांना कामगारांना रुजु करून घेण्याबाबत आदेश काढावा, अशी मागणी ननावरे यांनी निवेदनातून केली आहे.