Pimpri : पूरग्रस्त नागरीवस्तीमध्ये सुविधा पुरविण्यात याव्यात; विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – गेल्या दोन तीन दिवसापासून शहरात पुराने थैमान घातले आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठच्या नागरीवस्तीमध्ये पुराचे पाणी जाऊन नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या पूरग्रस्त नागरीवस्तीमध्ये सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे कि, या स्थंलातरीत केलेल्या नागरीकांचे सध्या मनपाच्या शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. आता पुर ओसरला आहे, त्यामुळे नागरीक स्वत:च्या घरात जाऊ लागले आहेत. परंतु पुराच्या पाण्याबरोबर आलेला राडारोडा, गाळ नागरीकांच्या घरात, रस्त्यावर साचून राहिलेला आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे ड्रेनेज लाईन चोकअप झालेल्या आहेत. त्यामुळे या परीसरामध्ये साथीचे रोग फैलावण्याची भिती आहे.

  • संपूर्ण शहरामध्ये ज्या – ज्या ठिकाणी नागरीवस्ती मध्ये पुराचे पाणी आले आहे त्या ठिकाणाच्या ड्रनेज लाईनचे चोक अप काढण्यात यावेत, रस्त्यावरील रोडारोडा, गाळ त्वरीत उचलण्यात यावा. डास, मच्छरचा फैलाव होऊ नये, म्हणून धुरीकरण करण्यात यावे. वैद्यकीय सुविधेसाठी या भागात तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय कक्ष चालू करण्यात यावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.