Pimpri: ‘टपरी-पथारी-हातगाडी धारकांना व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक अनुदान द्या’

Pimpri: Provide financial assistance to Tapari-Pathari-road side sellers to start business demand by panchyat केंद्र सरकारच्या वतीने टपरी पथारी हातगाडी धारकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांपासून टपरी-पथारी-हातगाडी व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने करण्यात आली आहे.

टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वतीने टपरी पथारी हातगाडी धारकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ देशभरातील टपरी पथारी हातगाडी धारकांना पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

मात्र, महानगरपालिकेकडून या लाभार्थ्यांना योजनेबाबत व्यवस्थित माहिती दिली जात नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे, यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा अशी मागणी टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने करण्यात आली आहे.

तसेच टपरी पथारी हातगाडी व्यावसायिकांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पंचायतकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.