Pimpri: रस्ताबाधित नागरिकांना आवास योजनेमध्ये घर द्या, नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी गावात प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. रस्त्यामध्ये प्रभाग क्रमांक 21 मधील अनेक नागरिक बाधित होणार आहेत. या नागरिकांना आवास योजनेत घर देण्याची मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी मधील सर्व्हे नंबर 226 पै./3 अ व 227 आरक्षण क्र.159 ( HDH ) येथील महापालिकेच्या ताब्यातील HDH च्या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधणेचा प्रकल्प नियोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 21 मधील रस्त्यामुळे बाधित होणा-या लोकांना घरे देण्यात यावीत.

रस्ता बाधित लोकांना बांधकाम नियंत्रण व अनधिकृत बांधकाम विभागामार्फत नोटीस देखील देण्यात आली आहे. 1979 पासून नागरिक त्या जागेवर वास्तव्यास आहेत. योजनेचे नियोजन करताना आरक्षण बाधित लोकांचा महापालिकेच्या झो.नि.पु. विभागामार्फत सर्वे करून योजनेमध्ये घरे देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.