Pimpri : पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित पीपीई किट, टेम्परेचर गन उपलब्ध करून द्या -प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – संचारबंदीमध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस 24 तास ठिकठिकाणी तैनात आहेत. पोलिसांना कायम बाहेर राहवं लागत असल्यामुळे व वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत असल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित पीपीई किट व‌ टेम्परेचर गन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

देशात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या महामारिला नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. तसेच सरकारने कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी लाॅकडाऊन सारखा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

तरीसुद्धा काही नागरिक बेजबाबदार पणे बाहेर फिरत असतात या लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस कर्मचारी या लोकांच्या संपर्कात येतात. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी माहित नसल्याने पोलिस कर्मचार्यांना संक्रमणाचा जास्त धोका जाणवत आहे.

पोलिस चेक पोस्ट वरती तोंडाला मास्क न बांधता आलेले नागरिक असतात तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग चे पालन होत नाही, त्यामुळे पोलिसांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन त्वरित पोलिस कर्मचार्यांना पीपीई किट व‌ टेंम्परेचर गण उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

तसेच अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांना नागरिकांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा परवाना देखील रद्द करावा, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.