Pimpri: आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबची प्रांतीय परिषद ऑनलाइन

Pimpri: Provincial first Online Conference of the International Lions Club

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब प्रांत 3234D2 ची ई- कॉन्फरन्स ऑनलाइन पद्धतीने प्रांतीय प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताच्या प्रथम महिला श्रद्धा पेठे यांच्या उपस्थितीत पार पडली.

या परिषदेची सुरुवात मुग्धा कुलकर्णी यांच्या गणेश वंदनेनी झाली. याप्रसंगी ब्रम्हकुमारी सुनीता यांनी ‘प्रेशर टू प्लेजर’ हे प्रोत्साहन पर भाषण सादर केले. या परिषदेमध्ये ई- मतदान पार पडले.

त्यात 2020-21 या वर्षासाठी नवीन प्रांतपाल म्हणून सीए अभय शास्त्री, प्रथम प्रांतपाल पदी हेमंत नाईक यांची सर्व मताने निवड झाली. तसेच द्वितीय प्रांतपाल पदासाठी राजेश कोठावदे बहुमताने निवडून आले.

या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रवीण छाजेड यांनी ऑनलाइन पद्धतीने उदघाटन केले व या परिषदेस आपल्या शुभेच्छा दिल्या.

या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय संचालक नवल मालू, माजी आंतरराष्ट्रीय संचालिका अरुणा ओसवाल यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या व माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून आपले मार्गदर्शन केले.

तसेच मल्टिपल 3234 चेअरमन सुनिल होरा, व मल्टिपल मधील प्रांतपाल, उप प्रांतपाल तसेच प्रांतातील मान्यवर माजी प्रांतपाल यांनी सुद्धा ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, सीआयआरटीचे संचालक राजेंद्र सनेर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

या परिषदेसाठी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्ते व वाहतूक यांनी शुभेच्छा पत्र पाठवून आपल्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या संकटामुळे सर्व सदस्य एकत्रित जमू शकत नसल्यामुळे प्रांत परिषद प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.