Pimpri:  उमा खापरे,  अमित गोरखे यांच्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य; अज्ञातावर गुन्हा

Provocative statements about Uma Khapre, Amit Gorkhe; Crime on anonymity : यमुनानगर पोलीस चौकीत तक्रार

एमपीसी न्यूज – एका मराठी वृत्तवाहिनीचा पत्रकार बोलत असल्याचे फोनद्वारे सांगत भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खापरे, गोरखे यांनी यमुनानगर पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांना भेटून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तक्रारीत म्हटले आहे की, एक अज्ञात इसम वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून मी मराठी वृत्तवाहिनीचा रिपोर्टर बोलतोय अशी खोटी बतावणी करत आहे.

_MPC_DIR_MPU_II

भाजपा मधील अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना फोन करून उमा खापरे व अमित गोरखे यांना भाजपाने एवढी मोठी जबाबदारी का दिली. तुम्ही विरोध का केला नाही, असे म्हणत त्या पत्रकाराने वेगवेगळ्या 4 नंबर वरून अनेकांना फोन करून असे सांगून चिथावणी खोर वक्तव्य करून पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांची भेट घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.

भाजप सरचिटणीस राजू दुर्गे, सरचिटणीस व नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शैला मोळक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1