Pimpri : विविध सामाजिक राजकीय संघटनांतर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवांनाना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांच्या वतीने जिजाऊ पर्यटन केंद्र चिंचवड येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळा निवृत्त नौसेना अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, राज अहेरराव, शिवाजी शिर्के, शोभा जोशी, मधुश्री ओव्हाळ, राधाबाई वाघमारे, सुहास घुमरे, उमेश सणस, नंदकुमार मुरडे, बाळासाहेब घस्ते, आय के शेख, गोरख चव्हाण, रामचंद्र आडकर, संभाजी रणसिंग, कैलास भैरट, पितांबर लोहार या सर्व साहित्यिकांनी शहीद जवानांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. या भ्याड हल्ल्याचा निषेध काव्यातूनही व्यक्त केला. सविता इंगळे आणि सुरेश कंक यांनी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित पवार यांनी आज सांगवीमध्ये साई चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी सांगवीतील साई मंदिराच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आरतीसाठी पार्थ पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक नवनाथ जगताप, नाना काटे, राजू मिसाळ, माजी नगरसेवक अतुल शितोळे, प्रसाद शेट्टी तसेच मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पिंपळे गुरव शिवाजी चौक, रामकृष्ण चौक ते एम एस काटे चौक, कृष्णा चौक, काटे पुरम चौक, डायोनोसर गार्डन ते पुन्हा शिवाजी चौक असा मेणबत्ती मोर्चा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. त्यानंतर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मोर्चामध्ये नगरसेविका उषा मुंडे, शारदा सोनवणे, सीमा चौगुले, नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, अंबरनाथ कांबळे, संजय मराठे, साई कोंढरे, तोफीक सय्यद, पंकज सारसर, राजू आवळेकर, अदिती निकम, राणी कर्व, शिवाजी निम्हण, अनिल कांबळे, मनीष कदम, पंकज सोंहणी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लिनीअर गार्डन येथे शत्रुघ्न काटे फ़ाउंडेशनच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना बैंकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, चंदा भिसे, सुप्रिया पाटील आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

वै.ह. भ. प. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुलकर, पर्यवेक्षिका सविता आंबेकर, संगीता पराळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.