BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पुणे-एर्नाकुलम-पुणे साप्ताहिक एसी रेल्वेगाडीला एप्रिलपासून मिळणार थांबा

प्रवासी संघाच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाचे स्वागत

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे दर सोमवारी येत्या 15 एप्रिल ते 5 पाच जून दरम्यान पुणे-एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित (एसी) रेल्वेगाडीला थांबा मिळणार यांचे चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाचे स्वागत करण्यात येत आहे. सोमवारी (दि.25 मार्च)पासून चिंचवड येथील आरक्षण केंद्रातून कोकण, गोवा, मेंगलोर आणि दक्षिण राज्यात उन्हाळी हंगामातील सुट्टीनिमित्त जाणार्‍या प्रवासीयांनी जास्तीत-जास्त आगाऊ तिकीटे आरक्षित करण्यात यावी, असे आवाहन चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी केले आहे.

पुणे येथून येत्या 15 एप्रिलपासून दर सोमवारी ही (गाडी क्र.01467) प्रथमच 13 डब्याची (एसी) वातानुकूलित संपूर्ण असणार आहे. अंदाजे 832 प्रवासी यातून प्रवास करु शकतील. ही गाडी चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळून, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, थिवींम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबीक रोड, कुंदापूरा, उडपी, मुल्की, सुरत्काळ, मेंगलोरु जंक्शन, कासारगुड, कन्नूर, कोझिकोडे, शौरनोर जंक्शन, त्रिचूर, अलुवा आणि एर्नाकुलम् जंक्शन बुधवारी 1.30 मिनिटांनी पोहोचणार आहे. एर्नाकुलम् जंक्शन येथून दर बुधवारी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी सुटून वरील परतीच्या मार्गाने चिंचवड येथे गुरुवारी सकाळी 11 वाजता थांबणार आहे. पुणे-एर्नाकुलम् 1421 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 32 तास 40 मिनिटाचा अवधी लागणार आहे.

  • चिंचवड प्रवासी संघाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांना 29 जानेवारी रोजी चिंचवड रेल्वे स्थानकाला त्याच्या भेटी दरम्यान लेखी निवेदने दिली होती. त्यात मुंबई-हैद्राबाद, दादर-चेन्नई, मुंबई-कन्याकुमारी, लोकमान्य टिळक ते हुबळी, श्री छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) ते अहमदाबाद, जयंती जनता, पुणे-अहमदाबाद, पुणे-गोरखपूर, प्रगती, इंद्रायणी, या एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड येथे प्रथम प्रायोजिक तत्त्वावर थांबा देण्याची मागणी केली होती.

पुणे-एर्नाकुलम् सध्या संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटते तिचा थांबा मिळावा. इतरांसाठी गेली अनेक वर्षे प्रवासी संघटना लढा देत आहे. पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष देखील एर्नाकुलम् एक्सप्रेसच्या थांब्यासाठी प्रयत्नशील होते. रेल्वे मंत्र्यापासून सर्व इतर संबंधितांनाही वेळो-वेळी पत्रव्यवहार भेटी दिल्या होत्या. शेवटी आता गाडी थांबविण्याचा निर्णय घेतला तिही वातानुकूलित तिचा अंदाजे 1700 रुपयांहून अधिकचा भार पिंपरी-चिंचवडकरांना एका तिकीटासाठी करावा लागणार आहे.

  • सध्या संध्याकाळी पुण्याहून सुटणारी एर्नाकुलम एक्सप्रेस गाडीला फक्त 375 रुपये तिकीट दर आहे. एकप्रकारे सोय देताना पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला आर्थिक झळ, खिशाला कात्री लावूनच रेल्वे प्रशासन सोय करणार याचा विचार करण्याची आज आवश्यकता आहे. चिंचवड येथून दररोज 150 हून अधिक एक्सप्रेस गाड्या दररोज धावतात. परंतू नेहमीच येथील प्रवाशांना दुय्यमस्थान मध्ये रेल्वेकडून दिले जाते, ही कष्टकरी, कामगारनगरीची शोकांतीका देखील आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात हॉटेलमध्ये काम करणारे, टायर काम करणार कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तसेच कोकणात राहणारा वर्ग कामगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात या शहरात आहे. सुमारे 5 लाख दक्षिण आणि कोकणवासीयांची लोकसंख्या आहे. त्यांना जयंती जनता एक्सप्रेस गाडी पकडण्यासाठी पुणे येथे जाण्याची वेळ येते कोकणवासी रस्ते मार्गानेच जाणे पसंत करतात. कुटूंबातील अनेक सदस्य एकत्रित प्रवास करतात. त्याच्याकडे येता-जाता सामानही जास्त असते. याचा विचार मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला पाहिजे.

  • वातानुकूलित एर्नाकुलमचे महागडी तिकीटाचा दर गरीबरथ प्रमाणे आकारावा, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रवासी किती प्रवास संघ घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहे. इतर एक्सप्रेस गाड्या चिंचवड येथे थांबवण्यात पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी कशी होईल, याचा पाठपुरावा देखील करणार आहे. त्यात प्रवासीसंघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी नारायण भोसले, सूरज आसदकर, अ‍ॅड. मनोहर सावंत, निर्मला माने, शरद चव्हाण, जबीन इफ्तेखारी, मुकेश चुडासमा आदींचा समावेश आहे.
.

HB_POST_END_FTR-A1
.