Pimpri : पुणे, पिंपरी चिंचवड मनपाने शहरातील रिक्षाचालकांना 5000 सानुग्रह अनुदान म्हणून द्यावे – आण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षाचालकांना 5000 सहायत्ता अनुदान म्हणून वितरीत करण्यात यावे. याबाबत लवकर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी लेखी सूचना आमदार बनसोडे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे केली आहे.

मनपा आयुक्तांना केलेल्या सूचना पत्रात बनसोडे म्हणतात, ऑटोरिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे वाहन असून रिक्षाचा रंग, हद्द, प्रवासी संख्या, मीटर, चालक, मालक गणवेश याच बरोबर इंधन प्रकार अशा बाबी शासन ठरवून देते. म्हणूनच शहराच्या पर्यावरण रक्षणासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पूर्वी एलपीजी व आता सीएनजी इंधनाची सक्ती रिक्षा वाहनास बंधनकारक केलेली आहे.

शहरातील अंर्तगत प्रवासी वाहतुकीच्या उपाय योजनेसाठी रिक्षासह सर्व वाहतूक गेले सव्वा महिन्याहून अधिक काळ बंद आहे. रोजची कमाई थांबल्यामुळे व मुळात आर्थिक स्थितीमुळे अडचणीची असल्याने रिक्षा चालकांची परिस्थिती अधिकच अडचणीची झाली आहे.

शहरातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या या घटकाला महापालिकेने मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. यापूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांनी पालकसंस्था म्हणून रिक्षा चालकाला सीएनजी किट साठी प्रत्येकी रुपये 12000 अनुदान दिले होते.

त्या अनुषंगाने सध्याच्या कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भविलेल्या परिस्थीतीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हे रिक्षाचालकांचे उत्पन्न बंद झाले आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड हद्दीतील सामान्य रिक्षाचालकांना सहाय्यता म्हणून 5000 अनुदान मिळवे, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.