BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंडारी ग्लेशीयर येथे ट्रेकिंग करून परतला पुण्याचा युवकांचा ग्रुप

यात यमुनानगर निगडी येथील दुर्वा वैशंपायन हिचा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंडारी ग्लेशीयर येथे गार्डियन गिरीप्रेमी माऊंटेनिरिंग इंस्टिट्यूटच्या वतीने आयोजित ट्रेकिंग कॅम्प करण्यात आला होता. हा कॅम्प पूर्ण करून ग्लेशीयर येथे गार्डियन गिरीप्रेमी माऊंटेनिरिंग इंस्टिट्यूटचा ग्रुप नुकताच परतला आहे. यात सुमारे बत्तीस युवा सदस्यांनी सहभाग घेतला होता. यात पिंपरी चिंचवडच्या यमुनानगर निगडी येथील दुर्वा वैशंपायन हिचाही सहभाग होता.

गार्डियन गिरीप्रेमी माऊंटेनिरिंग इंस्टिट्यूटच्या वतीने अशा प्रकारचे ट्रेकिंग कोर्सेस घेतले जातात. हा कॅम्प या कोर्सचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • गार्डियन गिरीप्रेमी माऊंटेनिरिंग इंस्टिट्यूटच्या वतीने युवा वर्गाचा ग्रुपने पिंडारी ग्लेशीयरला ट्रेकिंग कॅम्पसाठी ९ मे रोजी प्रस्थान केले होते. या ग्रुपचे नेतृत्व अलमोडा येथील रॉक लार्जड एडव्हेंचरचे अध्यक्ष विनोद चंद भट्ट यांनी केले होते.

याबाबत विनोद चंद भट्ट यांनी सांगितले कि, या ट्रेकिंगबाबत कॅम्पमधील युवा याचे प्रशिक्षण दिले होते. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दीपक नेगी यांनी सहकार्य केले. गुरुवारी हा ग्रुप अलमोडा पोहचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

HB_POST_END_FTR-A2