Pimpri: कचरा जाळल्यास होणार दंडात्मक कारवाई, महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळू नये. अन्यथा, त्यांच्याविरुध्द प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे. 25 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियमातील तदतूदीतुसार तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांचे आदेशानुसार कचरा जाळणा-या व्यक्तींविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार महापालिकेमार्फत छोट्या स्वरुपात कचरा जाळणा-या व्यक्तींविरुध्द पाच हजार रुपये आणि मोठ्या स्वरुपात कचरा जाळणा-या व्यक्तींविरुध्द 25 हजार रुपये इतक्या रकमेचा दंड करण्यात येतो.

  • महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे पर्यायाने प्रदूषणामध्येही वाढ होत आहे. कचरा जाळल्यामुळे त्यामध्ये असलेल्या घटकांमधून विषारी वायू उत्सर्जित होतात. ते शरीरास अपायकारक असतात. तसेच त्यामुळे श्वसनाचे व फुफुस्सांचे आजार संभवतात. त्यामुळे नागरिकांनी कचरा न जाळता त्याचे नियमानुसार विल्हेवाट लावण्याकरिता महापालिकेमार्फत कचरा संकलनासाठी नियुक्त वाहनांकडे कचरा जमा करण्याची दक्षता घ्यावी.

तसेच शहरातील सर्व नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळू नये. अन्यथा त्यांचेविरुध्द प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी कचरा जाळण्याची घटना निदर्शनास आल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांचेशी संपर्क करुन त्यांना त्याची सूचना द्यावी, असेही आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.