BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दत्ता साने विरोधी पक्षनेता नव्हे सत्ताधारी पक्षाचे खरेदी नेता – योगेश बाबर 

पार्थ अजित पवार यांचे कर्तुत्व काय?

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चुकीच्या कामांबाबत मूग गिळून गप बसणारे दत्ता साने हे विरोधी पक्षनेते नव्हे तर सत्ताधारी भाजपचे खरेदी नेते आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे. तसेच पार्थ पवार हे अजित पवार यांचे पूत्र आहेत. त्यांचे स्व:ताचे कर्तृत्व काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून  आगामी लोकसभा निवडणूक पार्थ पवार लढविणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना पत्रकारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार बारणे म्हणाले, कोण पार्थ पवार,  पार्थ पवारची ओळख फक्त अजितदादांचे पूत्र एवढीच आहे. त्यांचे सामाजिक काम काय आहे. त्यांना स्वत: ची ओळख करून देण्यासाठी पोस्टरबाजी करावी लागते. त्याला प्रत्युत्तर देताना साने यांनी खासदार बारणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. आगामी निवडणुकीत बारणे यांचे ‘डिपॉजीट’ लोकसभेत राहणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याला शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे.

योगेश बाबर म्हणाले, दत्ता साने यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांची राजकीय अपरिपक्वता त्यांच्या  पत्रक बाजीतून दिसून येते. खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वत: या बाबत प्रतिक्रिया दिली नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपले मत मांडत असताना. कोण पार्थ पवार,  पार्थ पवारची ओळख केवळ अजितदादांचे पुत्र एवढीच आहे. त्याचे सामाजिक काम काय आहे. बारणे गेली पंचवीस वर्षे या शहरामध्ये राजकीय व सामाजिक काम करत असून नगरसेवक ते खासदार अशी त्यांची ओळख आहे. महापालिकेच्या पाच निवडणुका, विधानसभा, लोकसभा आशा निवडणुका लढवलेले खासदार आप्पा बारणे लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे.

मतदार संघामध्ये देखील  सर्वाधिक संपर्क ठेवणारा खासदार म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. दत्ता साने यांना खासदार आप्पा बारणे यांची व शहराची राजकीय पार्श्वभूमी माहित नाही. ते त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. स्थायी समितीचे अध्यक्षपद  हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  उमेदवार असलेले शाम वाल्हेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून बारणे यांनी राष्ट्रवादीचा पराभव करून मिळवले होते. 42 दिवस चाललेल्या या निवडणुकांचा इतिहास पिंपरी-चिंचवड शहरवाशियांना माहिती असून दत्ता साने यांचा बालीश वक्तव्यावरून त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते.

खासदार बारणे यांचे डिपॉजीट जप्त करण्याची भाषा करणारे साने यांनी 2014 लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी जाणून घ्यावी. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुल नार्वेकर यांचे डिपॉजीट बारणे यांनी जप्त केले होते. जे आपल्या उमेदवाराचे डिपॉजीट वाचवू शकत नाहीत ते दुस-याचे डिपॉजीट जप्त करण्याची भाषा करतात हा एक ‘विनोद’च  म्हणावा  लागेल. महापालिकेमध्ये सत्ता पक्षाच्या चुकीच्या कामावर आवाज न उठवणारे साने हे विरोध पक्षनेता नाही. तर, सत्ताधारी पक्षाचा खरेदी नेता असल्याचे बाबर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.