Pimpri: महासभेत दोन माजी महापौरांमध्ये खडाजंगी

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथील दुर्घटनेवर सभागृहात चर्चा संपल्यानंतर माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यावर बोलायला सुरुवात केली. त्याला माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेत गटनेते बोलल्यानंतर कोणीही बोलू नये असे संकेत आहेत. गटनेत्यांच्या अवमान होत असल्याचे सांगत काळजे यांना बोलण्यापासून त्यांनी रोखले. त्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली.

पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा आज (शुक्रवारी) आयोजित करण्यात आली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

पिंपळेगुरव येथील महादेव मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु असताना दगडी सभामंडप कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, सात ते आठ मजुर जखमी आहेत. या दुर्घनेवर सभागृहात चर्चा झाली. याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गटनेत्यांनी मागणी केली. त्यावर याबाबत एक बैठक घेण्यात येईल असे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

त्यानंतर माजी महापौर नितीन काळजे बोलण्यास उभे राहिले. त्यांनी पिंपळेगुरव येथील दुर्घनेवर बोलण्यास सुरवात केली. त्याला माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेत आम्हाला पण यावर बोलून द्यावे. गटनेते बोलल्यावर कोणीही बोलले नाही पाहिजे असे संकेत आहेत. गटनेत्यांच्या अवमान होत असल्याचे सांगत काळजे यांना बोलण्यापासून त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला.

त्यावर काळजे म्हणाले, ” मला रोखण्याचा तुमचा संबंध नाही. मी त्या दुर्घनेवर बोलत नाही. तुम्ही उगाच आकांडतांडव करू नका. एवढा गोंधळ घालू नका. मी बोलायचे की नाही महापौर सांगतील, तुम्ही सांगायची गरज नाही” त्याला कदम यांनी देखील आक्रमकपणे उत्तर दिले. त्यामुळे दोघांमधे खंडाजगी सुरू झाली. महापौर राहुल जाधव यांनी दुसरा विषय घेत काळजे यांना थांबविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.