Pimpri: बेल्ट रेसलिंगसाठी राहुल धोत्रेची निवड

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना (यूडब्ल्यूडबल्यू) युनाटेड वर्ल्ड यांच्या मान्यतेने कझाकस्तान येथे होणा-या जागतिक बेल्ट रेसलिंग (कुस्ती) स्पर्धेसाठी भारतीय संघात पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू राहुल धोत्रे याची निवड झाली आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना (यूडब्ल्यू,डबल्यू) युनाटेड वर्ल्ड यांच्या मान्यतेने कझाकस्तान येथे 17 ते 24 डिसेंबरदरम्यान जागतिक बेल्ट रेसलिंग (कुस्ती) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडीतील खेळाडून राहुल धोत्रे याची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्याचे अभिनंदन होत आहे.

60 किलो वजनात मुळशी नेरे येथील शुभम बाळासाहेब जाधव, 80 किलो वजनगटात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरास येथील राजवर्धन धैर्यशिलराव पाटील यांची तर 90 किलो वजनगटात फुगेवाडीतील राहुल चंद्रकांत धोत्रे याची निवड झाली आहे. 100 किलो गटात सांगलीतील माणिक सर्जेराव पाटील या चार जणांची भारतीय संघात निवड झाली आहे.

ऑल इंडिया ट्रेडशन रेसलिंग अॅन्ड पॅनक्रेशन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सी.ए.तांबोळी, आशियाई सुवर्णपदक विजेते कोच अमोल साठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व खेळाडूंना शाहू शिक्षण संस्थेचे संचालक अजय साळुंखे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बेल्ट रेसलिंग या खेळाला युनायटेड वर्ल्ड रेसलिंग ( यूडब्ल्यू,डबल्यू) ची मान्यता आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पीक कमिटीची मान्यता असून आशियाई ऑलिंम्पीक मध्ये सहभाग आहे. तसेच शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 2013 पासून यांचा समावेश आहे. ऑल इंडिया ट्रेडशन रेसलिंग अॅन्ड पॅनक्रेशन असोसिएशन ही राष्ट्रीय संघटना असून बेल्ट रेसलिंग या खेळाचे प्रतिनिधीत्व करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.