_MPC_DIR_MPU_III

Pimpri: राहुल गांधी माफी मांगो; भाजपचे पिंपरीत आंदोलन

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ भाजपने आज (सोमवारी) पिंपरीत आंदोलन केले. ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधींचे करायचे काय, खाली डोकेवर पाय’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात महापौर उषा ढोरे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, महिला प्रदेश सचिव उमा खापरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेविका शारदा सोनवणे, शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, महिला अध्यक्षा शैला मोळक, राजू दुर्गे, नंदू भोगले, अजय पाताडे, वीणा सोनवलकर, आशा काळे आदी सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

‘आम्ही सावरकर विचार वादी’, ‘राहुल गांधी यांचा जाहिर निषेध, जाहिर निषेध’, ‘राहुल गांधी यांच्या विधानाचा धिक्कार असो’, ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधी माफी मांगो’, ‘राहुल गांधींचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

राहुल गांधी काय म्हणाले होते?
दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘देश बचाओ’ रॅलीत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे. त्यासाठी माझ्याकडून माफीची मागणी केली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही. माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असे विधान गांधी यांनी केले होते. त्याचा भाजपकडून धिक्कार केला जात आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.