Pimpri : पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची पुणे विभागाच्या म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकतीच कलाटे यांची निवड केली आहे.

शिवसेना-भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात युती झाली आहे. त्यानंतर सरकारने विविध महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महामंडळावर घेऊन खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची पुणे विभागाच्या म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, युती झाल्यानंतर शिवसेनेने महापालिकेतील सत्तेत सहभाग मागितला आहे. भाजपने देखील सत्तेत सहभाग देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेत देखील शिवसेना सत्तेत सहभागी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.