Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात पावसाच्या हलका शिडकावा

एमपीसी न्यूज – सकाळपासून वातावरण ढगाळ असल्याने पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात उन्हाचा जोर कमी झाला आहे. त्यातच शहरात दुपारी काही ठिकाणी पावसाचा हलका शिडकावा झाला.  यामुळे वातावरणात काहीसा गारठा आला. वातावरणात गारठा आला असला तरी उकाडा कमी झालेला नाही.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात परिसरात दुपारच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ होते. काही ठिकाणी पावसाच्या अगदी हलक्या सरी पडल्या आहेत.

महाराष्ट्रात आज कोठेही मोठा पाऊस नाही. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही. त्यामुळे मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. अंदमान निकोबार मध्ये शनिवारी (दि. 8) मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर केरळमार्गे संपूर्ण भारतात मान्सूनचे आगमन होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. उन्हाचा चटका कमी झाला आहे. ऊन कमी झाले असले तरी उकाडा मात्र जैसे थे आहे. त्यामुळे मोठा पाऊस पडेपर्यंत वातावरणातील गरमाई जाणार नाही. दररोज दुपारी कामानिमित्त सुद्धा घराबाहेर न पडणारे नागरिक आज दुपारी देखील बाहेर पडू लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like