Pimpri : ‘स्वच्छ राजस्थान’ डोळे भरून पाहण्यासाठी नगरसेवक रवाना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक जयपूर राजस्थान दौ-यावर गेले आहेत. आज सोमवारी नगरसेवक राजस्थानला पोहचले आहेत. तेथील स्थानिक महापालिकांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध योजना, प्रकल्पांची पाहणी नगरसेवक करणार आहेत. या दौ-यावर 48 लाख रूपयांचा खर्च होणार आहे.

महापालिकेचे आठ क्षेत्रीय समिती सदस्य म्हणजेच 128 नगरसेवकांसह 24 क्षेत्रीय समिती स्वीकृत दौ-यावर गेले आहेत. राजस्थानातील उदयपूर, जयपूर आणि मध्यप्रदेशातील इंदोर येथे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्थानिक महापालिकांनी राबवलेले कचरा विल्हेवाट, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटन स्थळावरील स्वच्छता नियोजन आदी विविध योजना आणि प्रकल्पांची पाहणी नगरसेवक करणार आहेत. दरम्यान, या दौ-यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय सहा लाख रूपये खर्च अपेक्षित धरला असून आठ क्षेत्रीय समिती सदस्यांसाठी एकूण 48 लाख रूपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.