Pimpri: ‘वायसीएम’च्या अधिष्ठातापदी डॉ. राजेंद्र वाबळे रुजू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेंद्र वाबळे हे नुकतेच रूजू झाले आहे. यानिमित्ताने त्यांचा आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

वायसीएम रूग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेची मान्यता मिळाली आहे. त्यासाठी पालिकेने मानधनावर शासन प्रतिनियुक्तीवर डॉ. पद्माकर पंडित यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, डॉ. वाबळे हे नुकतेच रूजू झाले आहेत. यापुढे अधिष्ठाता पदाचा पदभार ते सांभाळणार आहेत.

  • यानिमित्ताने स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते डॉ. वाबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक राहूल कलाटे, राजेंद्र लांडगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.