BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : वाढदिवसाचे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत पिंपरी विधानसभेतून राजेश पिल्ले यांनी फुंकले रणशिंग

एमपीसी न्यूज – दक्षिण भारतीय भाजप आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश आण्णा पिल्ले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय नेते, नगरसेवकांसह हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पिंपरी विधानसभेतून त्यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून देखील चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे. पिल्ले यांनी देखील वाढदिवसाचे औचित्य साधत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथे दक्षिण भारतीय भाजपा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला.

  • यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सदाशिव खाडे, महापालिका स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, भाजप नेत्या उमा खापरे, ठाणे युवासेना प्रमुख केदार दिघे, क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पलांडे, नगरसेवक समीर मासुळकर, राजू मिसाळ, बाबू नायर, केशव घोळवे, शितल शिंदे, मोरेश्वर भोंडवे, मोरेश्वर शेंडगे, माऊली थोरात, शैला मोळक, शर्मिला बाबर, महेश कुलकर्णी, शेखर ओव्हाळ, मधुकर पाठक, राजू दुर्गे, प्रसाद शेट्टी, उल्हास शेट्टी, कुणाल लांडगे, राजु सावंत, राजू गावडे, अर्जुन ठाकरे, अजीज शेख, रोमी सिंधू, संजीवनी पांडे, अनिल लांडगे, संदीप नखाते, केतन पटेल, सलीम शिखलकर, विजय शींकर, उद्योजक गीता तीलवानी, दिलीप तीलवानी, अनिल भांगडिया, राकेश नायर, देवेंद्र सिंग, संदीप गाडे विठ्ठल भोईर, गणेश आहेर, संजीवनी पांडे, विजय सानप, देवदत्त लांडे, वैशाली खाड्ये, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, नीता परदेशी, सांडभोर ताई, गोरक्ष नवघणे, रामदास काळजे, कोमल काळभोर, विशाल वाळुंजकर, किरण वाघेरे, नारायण वाघेरे, मनोज गजभाये, रिजवान खान आदी मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3