Pimpri : छावा मराठा संघटनेचे रामभाऊ जाधव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव यांनीही विधानसभेची तयारी चालू केली आहे. ते चिंचवड किंवा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झाले आहे.

दरम्यान, छावा मराठा संघटनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे रामभाऊ जाधव यांनी सांगितले आहे.

  • विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०१९ मध्ये संपणार आहे. २०१४ मध्ये विधानसभेसाठी १८ सप्टेंबर रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. यंदाही सप्टेंबर महिन्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम एक महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांनी कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवणार, हे सांगणे टाळले आहे. ते लवकरच याबाबत घोषणा करणार आहेत.

मात्र, प्रस्थापित बड्या पक्षाकडून उमेदवारीसाठी विचारणा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. जाधव यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. शिवाजीनगर, औंध, खडकी, बोपोडी, इंदिरा वसाहत, डेक्कन, मुळारोड अशा सर्वच भागात त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातही त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. याच जोरावर ते मताधिक्य खेचू शकतात.

  • लोकसभा निवडणुकीत मतदान घटले आहे, याची नोंद घेत जाधव यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.