BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयित तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 23 वर्षीय भावाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल संजू उकिरडे (वय 22, रा चिंचवड) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण 17 वर्षाची असताना आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. ही घटना मे 2019 रोजी घडली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या पीडित बहिणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.