Pimpri : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आज शनिवारी आणि उद्या रविवारी दीपावली स्नेहमीलनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ गिरीश आफळे यांनी दिली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहू गटाच्या वतीने उद्या रविवारी सकाळी साडेसात वाजता यमुनानगर निगडी येथील एसपीएम प्रशाला येथे दीपावली स्नेहमीलन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अखिल भारतीय क्रीडा भारतीचे महामंत्री राज सज्जनलाल चौधरी भारत विश्वगुरु होण्याच्या दिशेने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

चिंचवड गटाच्या वतीने उद्या रविवारी सकाळी साडेसात वाजता थेरगाव गावठाण येथील कैलास मंगल कार्यालय येथे दीपावली स्नेहमीलन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ह.भ.प. डॉ यशोधन महाराज किसन साखरे हे प्रपंच आणि परमार्थ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.