Pimpri : रेशनिंग दुकानदारांनी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणेच धान्य वाटप करावे- गजानन बाबर

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या काळातही राज्यातील सर्व रेशनिंग दुकानदार जीवाची पर्वा न करता  नागरिकांसाठी अन्नधान्य वितरणाचे काम करत आहेत. याबद्दल ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनच्या वतीने सर्व दुकानदारांचे आभार मानण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना सेवा देण्याचे काम अशाच प्रकारे पुढे चालू ठेवण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. रेशनिंग दुकानदारांनी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणेच धान्य वाटप करावे, अशी सूचना फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा ग्राहक संरक्षण राज्य मंत्रालयाने हेल्पलाइन नंबर, इमेल, ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना त्यावर तक्रार करण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी सुचित केले आहे. तरी राज्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांनी याची नोंद घेऊन शासनाच्या नियमाप्रमाणेच (शासनाच्या परिपत्रकाप्रमाणेच) जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या नियमाप्रमाणेच धान्य वाटप करावे. जेणेकरून कोणाचीही तक्रार अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण राज्य मंत्रालयापर्यंत जाणार नाही अशी सुचना बाबर यांनी केली आहे. तसेच कोणत्याही रेशनिंग दुकानदाराने चुकीचे काम करू नये चुकीचे काम केल्यास त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील बाबर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.